गोकुळ शिरगाव / वार्ताहर
गौरव तुला सगळे बोलावतात रे ,…परत ये की रे,,,,,, अशी आर्त हाक मारून हृदय पिळवटून टाकणाऱ्या या हाकेने गोकुळ शिरगाव येथील नुकत्याच मनाला चटका लावून गेलेल्या बॉक्सिंग पटू गौरव( वय 18 )च्या मित्रत्वाचे नाते जपलेल्या वडील धनाजी म्हाकवे यांची ही अर्थ हाका ऐकून सगळेच गहिवरून जातात,
गोकुळ शिरगाव (तालुका करवीर) येथील म्हाकवे परिवार अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असून सगळ्यांच्या बरोबरच त्यांचे नाते मित्रपरिवाराने जोडलेले आहे, त्यातच गौरव नावाचा अत्यंत होतकरू असा मुलगा ज्याला खेळाची लहानपणापासूनच आवड होती. त्याची आवड जोपासत त्याच्याबरोबर नेहमी मित्रत्वाचे संबंध ठेवणारे त्याचे वडील धनाजी म्हाकवे (वय 43 )यांनी नेहमी त्याला साथ देत त्याच्या आवडीनुसार त्याच्या बॉक्सिंग मध्ये त्याला लागेल ती मदत नेहमी ते पुरवत आले. या घरच्यांच्या पाठबळावर गौरव याने सुद्धा बॉक्सिंग मध्ये सातत्य ठेवत तालुकास्तरावर. राज्यस्तरावर चांगल्या स्पर्धा गाजवल्या. तो आता नुकताच नावारूपास येत होता पण या सर्वांच्या वर अचानक नियतीने घाला घालून हा गौरव चा खेळ नियतीने थांबवला. गौरवने अचानकच या सगळ्यातून एक्झिट घेतल्याने याचा सगळ्यांनाच धक्का बसला.
गौरव बोलका .नेहमी हसरा असणारा मुलगा व खेळात अग्रगण्य असल्याने त्याचा गावात सगळ्यांनाच लळा लागला होता. आज गौरवच्या जाण्याने शेकडो जणांच्या मोबाईलवर गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या मिस यु गौरव…. व त्याचे फोटो ठेवून मिक्सिंग केलेल्या डोळ्यात पाणी आणणारे मराठी गीते ही आज प्रत्येकाच्या स्टेटस वर दिसत आहेत. त्यामुळे गौरवचा किती लोकांच्या बरोबर संपर्क होता या मोबाईलचे स्टेटस ॲप वरूनच दिसत आहे. पण नेहमी आपण एका मराठी भक्ती संगीतातून व गीतातून ऐकत आलो आहे… जो आवडी सर्वांना …तोची आवडे देवाला …….अशा म्हणी प्रमाणेच कदाचित गौरव सुद्धा देवाला आवडला असेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









