3656 सभासदांची अंतिम मतदार यादी जाहीर, 25 मार्चपासून प्रक्रिया
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही याची उत्कंठता शुक्रवारी संपली निवडणुकी संदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी , असे आदेश दिले आहेत, दरम्यान प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी तीन हजार 656 सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या आदेशानुसार निवडणूक ३१ मार्च पर्यंत स्थगित करावी , अशी मागणी गोकुळच्यावतीने केली होती.
कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी , असा विनंती अर्ज गोकुळच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केला होता . यावर मंगळवार दि . २ रोजी सुनावणी होवून न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केली होती . त्यानंतर पुन्हा नव्याने याचिका दाखल केली आहे . यावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती .









