प्रतिनिधी / कोल्हापूर
उच्च गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ असा विश्वास निर्माण केलेल्या गोकुळचे ‘टेट्रापॅक’ दूध ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले असून ‘सिलेक्ट’ नावाने हा ब्रँड विकसित केला आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अजारपणामुळे विश्रांतीवर असलेले चेअरमन रविंद्र आपटे यांनी निवासस्थानातूनच या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यु. एच. टी. ट्रीटेड होमोजीनाईज्ड पद्धतीने प्रक्रीया केली असून पहिल्या टप्प्यात दररोज 25 हजार लिटर दुधाचे पॅकिंग मुंबई परिसरात उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती अरुन नरके यांनी दिली. यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशिल देसाई, पी. डी. धुंदरे, अनुराधा पाटील, दीपक पाटील, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिशसिंह घाटगे, सत्यजित पाटील, बाबा देसाई, रामराज देसाई-कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, गुणनियंत्रण व्यवस्थापक समुद्रे, दुग्धशाळा चौधरी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहकांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न
सध्या बाजारामध्ये गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची दररोज 12 लाख लिटरपर्यंत विक्री होते. मुंबई व उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, पुणे येथील ग्राहक दैनंदीन कामकाजामुळे दररोज दूध आणणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांची अडचण आणि गरज ओळखूनही सेवा दिली आहे. `महानंद’ मुंबई येथे दूधावर प्रक्रीया व पॅकिंग होणार आहे.
रविंद्र आपटे, चेअरमन, कोल्हापूर जिल्हा दूध संघ
ब्रँडची वैशिष्ठ्ये
-मनुष्य हस्तस्पर्श विरहीत हाताळणी
-स्वयंचलित अत्याधुनिक प्लँन्टमध्ये प्रक्रीया व पॅकींग
-135 ते 137 डिग्री सेंटीग्रेडला हिटींग होणार
-बॅक्टेरीया नष्ट होऊन 180 दिवस रुम टेंम्प्रेचरला टिकण्याची क्षमता
-पॅकींग उघडल्यानंतर रेफ्रिटरेटेड तापनाला किमान दोन दिवस वापर शक्य
-सहा स्तरीय असेप्टीक कार्टनमध्ये पॅकींग
-पॅकींग मटेरीयल अंतराष्ट्रीय नामवंत कंपनीकडून
-दररोज 25 हजार पॅकिंग
-1 लिटरला 64 रुपये दराने मिळणार









