प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लज – आजरा मार्गावर गिजवणे गावाजवळील आंबेओहोळ ओढ्याजवळ दुधाची वाहतूक करणारा ४०७ टेंपो आणि सिलेंडर भरलेला ट्रक यांची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. आज, सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला. सिलेंडरचा ट्रक उलटल्याने गॅसला गळती लागल्याने या मार्गावरची वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. अपघात पहाण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.










