वार्ताहर/ उचगांव
गांधिनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी 9 ने वाढली. गांधीनगर परिसरामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 348 वर पोहोचली आहे.
वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. उचगावमध्ये रुग्णांची संख्या स्थिर राहिली. गांधीनगरमध्ये सहा रुग्णांची भर पडली. वसगडे येथे एकही रुग्ण आढळून आला नाही.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची सोमवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (154), वळिवडे (69), उचगाव (75), गडमुडशिंगी (28), चिंचवाड (22). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 348 वर पोहोचली आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 20 बळी, 781 पॉझिटिव्ह
Next Article सौदीच्या अराम्कोचा नफा 73 टक्क्मयांनी घसरला








