“गणपती बाप्पा मोरया कोरोनाला हरवूया” च्या जयघोषात आगमन
प्रतिनिधी / पाटगांव
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करत कडगांव-पाटगांव परिसरात “गणपत्ती बाप्पा मोरया कोरोनाला हरवू या’”चा जयघोष करीत आणि वरूण राजाने दिलेली अधून-मधून सलामीत आज घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाचे गणपतीचे आगमन झाले. यावेळी कोणत्याही प्रकारचा ढोल-ताशा, फटाक्यांची आतिषबाजी न करता अगदी शांतपणे व भक्तीपूर्ण वातावरणात गणेशाचे आगमन करण्यात आले.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसराला घाटमाथ्यावरील कोकण परिसर अशी ओळख आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो .गणेशोत्सवामुळे या भागात उत्साहाचे वातावरण आहे ‘कोकण म्हणजे गणेशोत्सव…कोकणात गणपती उत्सवाची धूम काही वेगळीच असते. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणार्या गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातात
या वर्षी कोरोनाचे संकट असताना देखील बळीराजाने विघ्नहर्त्या गजानानचे स्वागत मोठ्या उत्साहात केले ठिकठिकाणी आनंदी वातावरणात गणेशाचे घराघरात आगमन झालंय. काही लोकांनी कालच गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले आहे. तर काही लोकांनी आज आणले आहे. बहुतांश लोकांचे घरी गणपतीचे आगमन झाले आहे. कोकणातील वाडी वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गणपती डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचे आगमन होत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी कारमधुन गणपती आणत होते.
शेतकर्याला सुखी ठेवण्याचे साकडे सुद्धा घालण्यात येत आहे. कोकणातील गणपती सण सर्वात मोठा सण असल्याने अनेक गावात एकाच दिवशी एकाच वेळी, पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन गावात होत आहे. चाकरमानी गणरायाच्या सेवेसाठी कोकणात अगोदर पंधरा दिवस दाखल झाले आहेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.