पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर, खासदार संजय मंडलिक यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील तिसऱया टप्याअंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील एकूण चार कामांकरीता 7 कोटी 52 लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून ही योजना राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा कार्यान्वीत असून यापैकी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी – तनवाडी – हणमंतवाडी – चिंचेवाडी रस्त्यासाठी 1 कोटी 35 लाख, प्रजिमा 56 जरळी ते शिंदेवाडी – खमलेहत्ती – भडगांव प्रजिमा 57 रस्त्यासाठी 1 कोटी 89 लाख, रा.मा. 201 – नरेवाडी ते माणवाड – तेरणी रस्त्यासाठी 2 कोटी 52 लाख रूपये असे गडहिंग्लज तालुक्यातील तीन कामांसाठी एकूण 5 कोटी 76 लाख रूपये तर राधानगरी तालुक्यातील घोटवडे-राशिवडे (करवीर तालुका हद्द) या एका रस्त्याकरीता 1 कोटी 76 लाख रूपये मंजूर झाले आहेत. दुर्गम व डोंगराळ भागातील हे रस्ते मंजूर झाल्याने येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत होणार असल्याकारणाने प्रवाशी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









