प्रतिनिधी / गडहिंग्लज
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, sebc कोठ्यातून मराठा विद्यर्थ्यांना शाळा व महाविद्यलयात प्रवेश मिळावा, आण्णासाहेब पाटील महामंडळास हजार कोठीचा निधी मिळावा, सारथी संस्थेस स्वायत्तता मिळावी, मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठेपर्यंत शासनाने नोकरभरती थांबवावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने गडहिंग्लजच्या दसरा चौकात रास्ता रोको करण्यात आला. आजरा, नेसरी रस्ता अडवण्यात आला होता.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किरणराव कदम, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. सुनिल शिंत्रे, दिग्वीजय कुराडे, विठ्ठल भम्मानगोळ, सुरेश कोळकी, सुरेश आस्वले, राजेंद्र तारळे, शोभा कोकीतकर, दिलीप माने यांनी मार्गदर्शन केले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे आजरा, नेसरी, चंदगड मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.