प्रतिनिधी / गगनबावडा
गेल्या आठवड्यात पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोनाबाधित निघाला. शुक्रवारी दुसरा कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने गगनबावडा तालुक्यात भीती वाढली आहे. गगनबावडा तालुक्यातील वनविभाग कार्यालयातील कर्मचार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचा रहिवासी असून चार दिवसांपूर्वी तालुक्यातील काही जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांना गगनबावडा येथील कोरोना सेंटरमध्ये क्वॉरन्टाईन केले आहे. कोरानाबाधित कर्मचाऱ्यास शिरोळ येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. गगनबावडा पोलिस ठाण्यातील एक कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सी. पी. आर. येथील कोरोना सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तालुक्यात बाधित ठरलेल्या सातही जणांचा अहवाल कालांतराने निगेटिव्ह आल्याने गगनबावडा तालुका कोरोनामुक्त ठरला होता. मात्र शासकिय कार्यालयातील दोघजण कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








