वार्ताहर / साळवण
गगनबावडा पोलिस ठाण्यात खाजगी सावकार सरदार कोटकर यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हाचा तपास गगनबावडा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्याकडून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे वर्ग करावा या मागणीसाठी साखरी (ता.गगनबावडा) येथील विठू हरी कोटकर व मंगल श्रीकांत कोटकर हे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सामूदायिक आत्महत्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन पोलिस अधिक्षक कोल्हापूर यांना दिले आहे.
विठू हरी कोटकर यांनी त्यांचा मूलगा श्रीकांत कोटकर यांने खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खाजगी सावकार सरदार कोटकर यांच्या विरोधात गगनबावडा पोलिस ठाण्यात दिनांक १२ जून रोजी खाजगी सावकारी विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
गगनबावडा पोलिस ठाण्यात खाजगी सावकारी विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास गगनबावडा पोलिस ठाण्यातून काढून घेऊन दुसरीकडे वर्ग करावा तसेच या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा या मागणीसाठी व गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकयांच्या कडून भविष्यात मानसिक त्रास होऊ शकतो या कारणासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर कुटूंबासह सामूदायिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









