वार्ताहर/खोची
खोची ता.हातकणंगले येथील युवकाने नैराश्येतून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप ऊर्फ सचिन मानसिंग पाटील (वय-३८) असे या मृत युवकाचे नाव आहे. पेठवडगाव पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
पाटील याने दुधगाव रस्त्यावरील शेतात शुक्रवारी राञी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राञी उशिरा उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआर येथे करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सागर मोरे करीत आहेत.








