प्रतिनिधी / वाकरे
खुपिरे (ता.करवीर) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोल्हापूर जिल्हा शिवसेना पुरस्कृत सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला.
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून माजी खासदार कै.सदाशिवराव मंडलिक इरिगेशन , रिसर्च फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णलयातील अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते व आरोग्य राज्यमंत्री राजेश पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला. खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयात माजी आमदार चंद्रदिप नरके, कुंभी कासारीचे संचालक संजय बळवंत पाटील , पं. स. सदस्या सौ.यशोदा संजय पाटील, माजी सरपंच संजय डी.पाटील,तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, अशोक पाटील,अरविंद पाटील,तानाजी पाटील,अर्जुन पाटील,वसंत पाटील,हिंदुराव भोसले, उत्तम कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ .थोरात, डॉ.बणगे, ग्रामविकास अधिकारी अशोक पाटील , डॉक्टर , नर्स, स्टाफ, ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









