माणुसकी फाउंडेशनची तत्परता ठरली अनमोल
वार्ताहर / कबनूर
एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली होती याची चाहूल लागताच माणुसकी फाउंडेशन कार्यकर्त्यांनी माणुसकी दाखवत धावून गेले एक तास वाट पाहिली पण ती अॅबुलन्स वेळेत न आल्याने अखेरीस पोलीस विभागाच्या गाडीचा वापर करून त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माणुसकी फाउंडेशन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या माणुसकीला व त्यांनी वेळेत केलेली मदत ही लाख मोलाचे असून या फाऊंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. अखेरीस रुग्णवाहिकेपेक्षा पोलिसांची गाडीच ठरली जीवनदायी खरोखरच पोलिसांनी दाखवून दिलेली मदत हे अनमोल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्या पाहुण्यांच्या सोबत गरजू लोकांना फराळ वाटप करून त्यांची ही दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदात साजरी होईल हे विचार मनात घेऊन माणुसकी फौंडेशनने गरजू लोकांना फराळ वाटप करण्याचा कार्यक्रम प्रत्येक गावो-गावी राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे गरजूंना फराळ वाटप करताना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना एक बातमी समजली. कोरोची चव्हाण टेकडीच्या शेजारी एक विचित्र असे दृश्य आढळून आले. तात्काळ माणुसकी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. याठिकाणी एक माणूस बराच काळ नग्न अवस्थेत पडून होता. त्या माणसाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तोंडातून खूप प्रमाणात रक्तस्राव होऊन, त्यांना मोठ्या प्रमाणात झटके येत होते. ही घटना संशयित वाटल्याने फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहापूर पोलिस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर निकम यांना ही बाब कळवली. निकम यांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.

घटनेची पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली तर त्या व्यक्तीला तात्काळ दवाखान्यात पोहचवण्यासाठी माणुसकी फौंडेशनने १०८ रुग्णवाहिकेला सतत संपर्क ठेवून होते. मात्र ही रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नव्हती. त्यामुळे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी पोलीस गाडीमधून त्या व्यक्तीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला व त्यांना माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांनी पोलीस गाडीतून इचलकरंजी मधील आय. जी. एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु आय. जी. एम. रुग्णालयात उपचार होत नसल्याने तेथून त्या व्यक्तीला ताबडतोब हलवून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांनी दाखल केले. माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व शहापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वेळेत या व्यक्तीवर उपचार होण्याच्या दृष्टीने तत्परतेने पोलीस विभागाची गाडी दिखाऊपणा दाखवतात मात्र फाउंडेशनचे कार्यकर्ते व पोलिसांनी त्या व्यक्तीचे जीव वाचवण्यासाठी घेतलेले वेळेचे गंभीर हे अभिनंदनाला पात्र ठरणारे आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अखेरीस पोलिस गाडीच त्या व्यक्तीची जीव वाचवणारी रुग्णवाहिका उपयोगी ठरली असेच म्हणावे लागेल. उपचार घेत असलेली व्यक्तीचे नाव हेमंत मारुती पवार (वय45) रा. इचलकरंजी, मासाळ गल्ली क्र. चारमधील येथील आहे. या जखमी व्यक्तीवर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले.









