प्रतिनिधी / सांगरूळ
खाटांगळे (ता . करवीर) येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या ६४ पैकी ६० जणांना होम क्वारंनटाईन केले असून त्याच्या कुटुंबातील चौघांचा स्वॅब तपासणीसाठी देण्यात आला आहे. ६४ जण याच्या संपर्कात आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्ती खाटांगळेतील परशराम नगर येथील रहिवासी असून कोल्हापूरातील एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. कंपनीतील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या तरुणाचा दोन दिवसापूर्वी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याला कोणतीच लक्षणे जाणवत नसल्याने तो इतरांच्या संपर्कात आला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाला उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे.








