वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी तालुका करवीर येथील मास्टर रेहान शकील नदाफ हा एक होम स्कूलर आहे. इयत्ता तिसरीच वय कोरोना या महामारीमुळे सर्व शाळांना सुट्टी आहे. संपूर्ण जग थांबले आहे. परंतु या सुट्ट्यांचा उपयोग कसा करावा हे रेहानने वेगळ्या पद्धतीने दाखवून दिले या काळात एमपीएससी यूपीएससी चे 1000 प्रश्न रेहाननेहाने लक्षात ठेवले. त्याचबरोबर कोरोना होऊ नये त्यासाठी उपाय योजना काय करावे यासाठी चे छोटे छोटे व्हिडिओ करून युट्युब व्हॉट्सऍप ट्विटर फेसबुक या सोशल मीडियावर प्रसारित केली त्याचबरोबर या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद ही मिळाला आहे.
मास्टर रेहान हा आपल्या वक्तृत्व कलेच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षापासून सुपरिचित आहे. आजपर्यंत त्याने अनेक विषयावरती समाजप्रबोधन केले आहे. या कोरोना महामारीमध्ये जनजागृती बरोबर अवयवदानाचे महत्त्व देखील तो पटवून देत आहे. त्याच्या या व्हिडिओचा सर्वजण आबालवृद्ध पासून बघत आहेत. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असताना घरी बसून अभ्यासाबरोबर समाजप्रबोधनाचं काम आणि स्तूत्य उपक्रम राबवत आहे. याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यापूर्वी नदाफ कुटुंबीयांनी बेटी बचाव बेटी पढाओ ही जनजागृती मोहीम देखील यशस्वीपणे पूर्ण केली होती. रेहानच्या या स्तुत्य उपक्रमाला प्रशासन देखील साथ देत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









