प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे तालुका करवीर येथे कै. दत्तात्रय पांडुरंग पाटील (मास्तर अण्णा) यांची 20 वी पुण्यतिथी दिन साजरा करण्यात आला. हा पुण्यतिथी दिन कोरोना योद्ध्यांच्या सत्काराने साजरा केला.
कोगे गावचे ज्येष्ठ व काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असणारे कै. दत्तात्रय पांडुरंग पाटील (मास्तर अण्णा) यांची ओळख संपूर्ण भागात होती. सामाजिक क्षेत्रात व राजकीय कारकिर्दीमध्ये मास्तर अण्णा यांनी अनेक पदे भूषवली होती. शिक्षण कमी पण उच्च विचाराच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मास्तर अण्णा ही नावाजलेले नाव आज एक वेगळी क्रेझ म्हणून परिचित आहे. असे सर्वांचे लाडके मास्तरांना यांची आज 20 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कोरोना जागतिक संसर्गजन्य महामारीने सर्वत्र हाहाकार माजला आहे. यामध्ये अनेक घरांचे कुटुंब कर्ते व सदस्य यांचा जीव गेला. या काळात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी, पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष आरोग्य सेवक व सेविका, आशा मदतनीस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला जीव मुठीत घेऊन समाजाची सेवा केली. अशा लोकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य समजतो, असे कुंभी कासारी साखर कारखान्याची सदस्य प्रकाश कुंडलिक पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
दत्तात्रय पाटील यांनी चालू केलेले सामाजिक कार्य आपले वडिल, चुलते व सर्व आप्तस्वकीयांच्या सहकार्यातून यापुढेही चालवत राहू असे छोटा नेता विश्वजीत पाटील याने आपल्या आजोबा बाबत मनोगतात सांगितले. शांत संयमी स्पष्ट सडेतोड व नि:पक्षपणे काम करणारे मास्तर अण्णा व आपण याचे अनुभव गोविंद मोरे यांनी सांगितले. तर कोरोना काळात काय परिस्थिती होती ? त्यावेळी आलेले अनुभव त्यावर केलेला इलाज याचे स्पष्टीकरण तंटामुक्त अध्यक्ष गणपती मिठारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात आरोग्य सेवक रवींद्र कोळी, आरोग्य सेविका साधना सूर्यवंशी, तंटामुक्त अध्यक्ष गणपती मिठारी, ग्रामविकास अधिकारी डि के आंबेकर, तलाठी पी आर ठाकूर, पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी, डॉ. केदार पाटील, डॉ.बाजीराव पाटील, डॉ. कुलदीप मरळकर, डॉ. भरत घंगरगोळे, डॉ. राजकुमार पावसकर, पत्रकार निलेश जाधव, प्रकाश पाटील, विश्वनाथ मोरे, बाजीराव तळेकर,मच्छिंद्र मगदूम, शिवराज लोंढे यांच्यासह जवळपास 62 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांना शील्ड, सर्टिफिकेट, व भेटवस्तू देऊन एका अनोख्या स्वरूपात पुण्यतिथी दिन साजरा केला.
यावेळी माजी सरपंच रवींद्र वेदांते, उपसरपंच विश्वास पाटील, व्हा. चेअरमन बाबुराव कांबळे,विकास पाटील, सौरभ पाटील, दत्तात्रय मांगोरे, शिवाजी डाफळे, शुभम पाटील, हरीश घराळ, विलास वाडकर, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विश्वनाथ मोरे, स्वागत डॉ. संतोष पाटील व आभार डॉ. विलास पाटील यांनी केले.









