प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआरमध्ये सोमवारी पहाटे निपाणी येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सकाळी 11 वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला डॉक्टरांनी व्हेंटिलेटर असूनही ते न वापरले नसलयाच्या निषेधार्थ ब्लॅक पँथर संघटनेने हा मृतदेह अधिष्ठाता कार्यालयासमोर आणला. तिथे सकाळी साडेअकरा वाजता हा मृतदेह ठेवण्यात आला, दुपारी साडे चार पर्यंत चार तास डॉक्टरांवर कारवाईसाठी मृतदेहासह आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक होऊन आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
निपाणी येथील प्रकाश पद्माना कांबळे वय 69 यांना रविवारी उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले होते. रात्री नातेवाईकांनी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून त्याला वेंटीलेटरची गरज असल्याचे डॉक्टरांना सांगितले होते, त्यावर योग्य ते उपचार करू, असे प्रशासनाने सांगितले होते.
पहाटे चार वाजता प्रकाश कांबळे यांचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू झाला. सीपीआरमध्ये ऑक्सिजनेटेड बेड आहेत. व्हेंटीलेटर आहेत , शंभर वेंटिलेटर पैकी 30 रुग्णांना ते लावले होते. उर्वरित 70 असतानाही त्याचा वापर झाला नसल्याने प्रकाश कांबळे यांचा मृत्यू झाला, असा आरोप ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी केला. त्यांच्या मृत्यूला महिला डॉक्टर कारणीभूत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली या मागणीकरिती कोरोना मृतदेह सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयासमोर सकाळी साडेअकरा वाजता आणून ठेवला. अधिष्ठाता कार्यालयाच्या पायऱ्यांवर कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन सुरू केले.
दुपारी एकच्या दरम्यान याची माहिती प्रशासनाला मिळाली. पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी चे अनिल गुजर तेथे आले त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांची होती. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. अजित लोकरे, डॉ. सिद्धार्थ कांबळे डॉ. सरवदे आदींनी आंदोलकांची समजूत काढली. यावेळी देसाई यांनी महिला डॉक्टर रामानंद यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली.
दरम्यान दुपारी अडीच वाजता ब्लॅक पँथर संघटनेने आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पोलीस निरीक्षक गुजर यांच्याकडे दिले. तसेच त्याची एक प्रत अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांना देण्यात आली.निवेदनात जिल्हाधिकारी देसाई यांनी महिला डॉक्टर रामानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रणजित प्रकाश कांबळे यांनी केली आहे. दरम्यान, निवेदन दिल्यानंतरही आंदोलन सुरूच राहीले. चार तासानंतर कोरोना मृतदेहावर मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, सीपीआरमध्ये जिल्हाधिकार्यांनी 100 व्हेंटिलेटर असल्याचे स्पष्ट केले आहे. येथे उपलब्ध शंभर पैकी तीस रुग्णांना लावण्यात आले होते उर्वरित 70 असतानाही ते राखीव का ठेवले , त्यापैकी एखादे या रुग्णाला लावले असते तरी त्याचा जीव वाचला असता, असे सुभाष यांनी स्पष्ट केले. व्हेंटिलेटर लावण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर कर्मचारी नसल्याचा आरोपही त्यांनी केला . प्रकाश कांबळे यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे त्यामुळे महिला डॉक्टर रामानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. डॉक्टर रामानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे फलक कार्यकर्त्यांनी घेतले होते. हीच मागणी डॉ. मस्के यांच्याकडे करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









