कोरोनामुक्तांची संख्या 37 हजारांवर, पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 46 हजारांवर
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 785 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 37 हजार 293 झाली आहे. दिवसभरात 287 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटीव्ह रूग्णसंख्या 46 हजार 15 झाली आहे. कोरोना बळींची संख्या 1 हजार 502 झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 632 जणांची तपासणी केली. त्यापैकी 304 जणांची अँटीजेन केली आहे. सध्या 7 हजार 220 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 909 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 767 निगेटिव्ह तर 140 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 304 रिपोर्ट आले. त्यापैकी 62 पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये सांगवडे करवीर येथील 69 वर्षीय पुरूष आणि दानोळी शिरोळ येथील 56 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये पट्टणकोडोली हातकणंगले येथील 65 वर्षीय महिला आणि कागवाड शिरोळ येथील 55 वर्षीय पुरूष्ग्नााचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अक्कोळ चिकोडी बेळगाव येथील 83 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. जिल्हÎात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 502 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 725, नगरपालिका क्षेत्रात 324, महापालिका क्षेत्रात 340 तर अन्य 113 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 785 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 37 हजार 293 झाली आहे. आजरा 3, भुदरगड 16, चंदगड 9, गडहिंग्लज 6, हातकणंगले 39, कागल 4, करवीर 26, पन्हाळा 6, राधानगरी 4, शाहूवाडी 3, शिरोळ 14, नगरपालिका क्षेत्रात 61, कोल्हापूर शहर 75 आणि अन्य 21 असे 287 रूग्ण असल्याची माहित्ना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.