प्रतिनिधी / पन्हाळा
कोडोली ता. पन्हाळा येथील अंबाबाई मंदिर जवळील राहत्या घराच्या मागील शेडमधील मागील खोलीत संतोष दिनकर केंकरे (वय ३६) या तरुणाने तुळीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजुशकलेले नाही पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संतोष याने मंगळवार दि. १४ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घराच्या मागील शेडमधील मागील खोलीत तुळीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या बाबतची वर्दी दिलीप सदाशिव केकरे यांनी कोडोली पोलिसात दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने करीत आहेत.








