वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील वारकरी मळा येथे मार्च महीन्यात विहीर दुरुस्तीचे काम सुरू असताना ढिगारा खचून त्याखाली दबून तिघांचा मृत्यु झाला होता यातील दोन गरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी विहीरीचे मालक असलेल्या वारकरी कुटूंबीयांनी दोन्ही कुटूंबांना प्रत्येकी दिड लाखाची मदत आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते देण्यात आली.
कोडोली ते काखे रोडपासून जवळ वारकरी मळा येथे विहीर दुरुस्तीचे काम सुरू असताना ढिगारा खचून त्याखाली दबून तिघांचा मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली होती यामध्ये अमोल सदाकळे, सिकंदर जमादार आणि महेश वारकरी यांचा मृत्यू झाला होता अमोल सदाकळे आणि सिकंदर जमादार यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या गरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी कोडोलीतील ज्या विहीरीचे दुरुस्तीचे काम सरू होते त्या विहीरीचे मालक महेश वारकरीही या अपघातात मयत झाले त्यांच्या कुटुबीयांनी मदतीचा हात पूढे करत मयत झालेल्या दोन्ही कुटूंबाना प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रूपयांचा धनादेश माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते ही मदत मयत झालेल्या वारसांना देण्यात आली.
यावेळी वारकरी कूटुंबीयानी सामाजिक बांधिलकीतून आर्थिक स्वरूपात मदत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशांत महापूरे, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, अमोल वारकरी, प्रशांत सिंहासणे,दिपक सकटे, दावीद दाभाडे यांच्यासह नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.









