मातृसेवा हॉस्पीटलवर छापा, डॉ. अरविंद कांबळेवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/वारणानगर
कोडोली (ता. पन्हाळा) येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करून अर्भक स्त्री कि पुरुष असल्याचे सांगण्यासाठी २० हजार रूपयाची मागणी करीत असताना डॉ. अरविंद कांबळे यांना रंगेहाथ पकडून कोडोली पोलीसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. अरविंद कांबळे हे मातृसेवा हॉस्पीटल येथे हजारो रुपये घेवून गर्भलिंग निदान करतात अशी गुप्त माहिती पोलिसासह आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली होती. सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक यानी आरोग्य विभाग व पोलीस यांचे पथक तयार करून सहनिशा करण्यासाठी बोगस डमी ग्राहक पाठवला होता. सदर महिलेची डॉ. कांबळे यानी तपासणी करून स्त्री अर्भक असल्याचे सांगून गर्भपात करण्यास २८ हजाराची मागणी केली होती. सदर उपचार तडजोडीअंती २० हजार रूपयावर मिटला ती रक्कम डॉ. कांबळे यानी ती रक्कम स्विकारून सदर महिलेची सोनोग्राफी केली आणि मुलगी असल्याचे सांगीतले. तसेच अद्याप लिंगाची स्पष्टता दिसून येत नसल्याने दि. २८ डिसेंबर रोजी या आणि त्यावेळी गर्भपात करू असे त्यांना सांगण्यात आले. गर्भपाताची रक्कम २८ हजार रू. सांगण्यात आली तथापी तडजोडीअंती तीही २० हजार रू. ठरली सदर महिलेला आज सोनोग्राफीला बोलवले होते. त्या नुसार डॉ.वेदक यानी सापळा रचून डॉ. अरविंद कांबळे यांना रंगेहाथ पकडले. डॉ. कांबळे यानी गर्भलिंग निदान केल्याचे कबूल केले आहे.
डॉ. कांबळे यांच्या मातृसेवा हॉस्पीटलचे सोनोग्राफी मशीन सन २०१७ पासून सील आहे. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तथापी सद्या हॉस्पीटलमध्ये आढळून आलेले मशिन बेकायदेशीर व विनापरवाना आहे. सदरचे मशिन देखील पथकाने सील केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर, अॅड. गौरी पाटील, वैद्यकीय अधिक्षक पन्हाळा तथा समूचीत अधिकारी डॉ. सुनंदा गायकवाड, कोडोली उपजिल्हा रुगणालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल अभिवंत,पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, फौजदार विभावरी रेळेकर, पोलीस नाईक अभिजीत घाटगे, कोडोली पोलीस ठाण्याचे फौजदार नरेद्र पाटील याच्यासह कर्मचारी यानी या कारवाईत सहभाग नोंदवला.डॉ.कांबळे यांचे विरूध्द पीएनडीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे.
कोडोलीतील ६८ वर्षाचे डॉ. अरविंद कांबळे गेली ३० वर्ष मातृसेवा हॉस्पीटलच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टीस करीत आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही विनयभंगा सारखे आरोप होऊन पोलीसात तक्रार झाल्या आहेत. त्याच्या बाबतीत गर्भलिंग तपासणी कायम करीत असल्याची चर्चा ही परिसरात असून गर्भलिंगसाठी ग्राहक आणून देणाऱ्या एजंटाची साखळी शोधण्याचे आवाहन तपास यंत्रणेपुढे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









