नादुरुस्त असल्याने घरे वापराविना
प्रतिनिधी/वारणानगर
चार अधिकारी आणि पन्नास पोलीस कर्मचारी यांच्यासाठी केवळ चारच खोल्याचे असलेले पोलीस निवास गेल्या काही वर्षात नादुरुस्त झाल्याने वापराविना पडून आहे. या निवासस्थानाचा परिसर झाडाझुडपानी लुप्त होत चालला आहे. ही अवस्था कोडोली (ता. पन्हाळा) येथील पोलीस निवासस्थानाची.
ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना निवासस्थान नसल्याने भाड्याच्या घरात रहावे लागते. कोडोली पोलीस ठाणे कार्यरत झालेवर माले फाटा येथे केवळ चार पोलीस कर्मचारी राहतील एवढ्या अल्प निवासस्थानाची सोय करण्यात आली. खुराड्या सारख्या पोलीस वसाहतीचे रुपडे बदलून शहरात अपार्टमेंट टाईप पोलीस वसाहत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तथापी ग्रामीण भागातील पोलीस कर्मचार्यांना अद्यापही रहायला घरे नाहीत. याकडे वरीष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही, याची झळ मात्र ग्रामीण पोलीसांना सोसावी लागत आहे.
एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन फौजदार, सहा. फौजदार,हावलदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई असा पन्नास वर कोडोली पोलीस ठाण्यास अधिकारी व कर्मचारी वर्ग आहे. पोलीस ठाण्याकडे उपलब्ध चार निवासस्थाने वेळीच देखभाल दुरुस्ती न झाल्याने नादुरूस्त आहेत. जुनी इमारत झाली असून रहाण्या योग्य राहीलेली नाही त्यामुळे ती वापराविनाच पडून राहिली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीस प्रस्ताव सादर करून वारंवार पाठपुरावा करून देखील वरीष्ठ अधिकाऱ्यानी याला मंजूरी आजवर दिलेली नाही त्यामुळे या इमारतीला घरघर लागली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याची देखभाल दुरुस्ती, रगरंगोटी कार्यरत अधिकारी, कर्मचारी लोकसहभागातून करतात वास्तवात पोलीस दलात पोलीस ठाणे व वसाहत यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन निधी देतेय का ? असाच प्रश्न नागरिकात चर्चेला असतो. तरी देखील पोलीसांना वसाहत गरजे प्रमाणे तयार करणेस आजवर पाठवलेल्या प्रस्तावास अधिकारी स्तरावर शासनाकडे पाठपुरावा केला जात नाही. अधिकारी दोन वर्षात बदलून जातात त्पामुळे त्यांना याच कामात विशेष लक्ष घालावे वाटत नाही जे अधिकारी प्रयत्न करतात त्यांना शासन दाद देत नसल्याने गप्पंच बसावे लागते. या सर्वाचा परिणाम म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी भाड्याच्या घरात राहून सेवा बजावत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









