प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे गावात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना मेणबत्ती लावून आदरांजली व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यामधील गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन युवक पाकिस्तानी केलेल्या भ्याड हल्लामध्ये संग्राम पाटील व ऋषिकेश जोंधळे या दोन जवानांना हौतात्म्य मिळाले. त्यांच्या कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला तो शब्दात व्यक्त करता येत नाही. आर्मी जीवन नोकरीच्या दृष्टिकोनातून व मिळणारा पगार आकडे पाहून अनेक जवान आर्मी भरती होण्यासाठी प्रयत्न करतात. पण भरती झाल्यानंतर व भरती अगोदर जे कष्ट घ्यावे लागत ते खरोखरच वाखाणण्याजोगे असते.
कोगे गावातून आर्मीमध्ये भरती होऊन रिटायर झालेले अशोक पाटील यांनी आर्मीत भरती होत असताना काय केले पाहिजे ? त्यासाठी सराव कशा पद्धतीने केला पाहिजे ? भरतीवेळी ग्राउंड वरती कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाते ? याचे स्वानुभव सांगितले. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये बेंगलोर येथे आर्मीत नवीन भरती सुरू होणार असून नवीन युवापिढीने यात सहभागी व्हावे असे सांगितले. त्याचबरोबर आर्मीमधून रिटायर झालेले दुसरे व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब पवार यांनी भरती होण्यासाठी अॅकॅडमीत जॉईन होणे का आवश्यक आहे ? तसेच नवीन पिढीने आर्मीत जॉईन व्हावे जेणेकरून देश सेवा संधी मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी कैवल्य हारुगले, करण पाटील ,विक्रम घराळ, कृष्णात चव्हाण, अनिल चव्हाण, तानाजी चव्हाण, सचिन मोरे, उदयसिंह पाटील, प्रवीण पाटील, अरविंद यादव, किरण सातपुते,सुजित पाटील, सिद्धेश मोरे तसेच गावातील सर्व तरुण वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेणबत्ती लावून अमर रहे अमर रहे… वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार उदयसिंग पाटील यांनी केले.