प्रतिनिधी / कुरुंदवाड
येथील महावितरण कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अन्यायी वाढीव वीज बिलाबाबत मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकापसह अन्य पक्ष व संघटनाकडून पाठींबा मिळाला.
कोरोना महामारीनंतर आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी मेटाकुटिला आला आहे. तरी या काळातील घरगुत्ती व शेती पंप वीजबिल भरमसाठ आल्याने हे संपूर्ण वीजबिल माफ करावे या मागणीसाठी आज कुरुंदवाड महावितरण कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अन्नासो चौगुले, विश्वास बालिघाटे बंडू उंमडाळे यांच्या नेतृत्वाखाली मोरचा काढून टाळे ठोकले.
यावेळी बोलताना स्वाभिमानी राज्यकार्यकारणी सदस्य अन्नासो चौगुले म्हणाले की, पाण्यावर होणारी वीज 15 पैसे युनिट दराने तयार होते. त्यातील 70 टक्के वीज उद्योग धंद्याला 30 टक्के शेतीला दिली जाते. यामुळे शेतीप्रधान देशात हा अन्याय क्शासाठी असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी विश्वास बालिघाटे रघु नाईक आदींनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी अन्यायी वीज दराबाबत आंदोलकानी घोषणा देत मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता सिकंदर मुल्ला यांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी संघटनेचे योगेश जिवाजे, प्रभाकर बंडगर शेकाप तसेच पुण्य पक्ष संघटनेचे अजित देसाई, सुदर्शन माळी, दीपक परीट शांतीनाथ भबीरे, अमर कुंभार बंडू पाटील शिवाजी रोडे विजय मालवेकर यासह संघटना आदी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









