प्रतिनिधी/कुरुंदवाड
नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील संभाजीनगर परिसरातील ओतवाडी भागात कचरा डेपोला अचानक आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यापूर्वी याबाबत मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सागर धनवडे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायत याबाबत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
गावातील कचरा डेपो ओतवाडी जवळील नृसिंहवाडी – औरवाड पुलालगत आहे. ग्रामपंचायतीने इथे कचरा टाकण्यात येतो. रविवारी रात्री उशिरा अचानक या कचरा डेपोला आग लागल्यामुळे धुरीचे लोट सगळीकडे पसरत आहेत. संभाजीनगर, दलितवस्ती परिसरात राहणारे रहिवासी, दुकानदार यांना यांचा आगीचा नाहक त्रास होत आहे. दरम्यान काही ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझली नाही. दुसरे दिवशी ही आगची झळ कायम होती. कचरा डेपो ला लागणारा आगीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सागर धनवडे, अकुंश संघटनेचे दत्ता मोरे, महेश साळुंखे, अण्णासाहेब रूकडे, शिरीष गंवडी यांनी दिला आहे.
Previous Articleश्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना जगू देणार नाहीत
Next Article सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला









