विनामास्क फिरणार्यांवर ग्रामपंचायत करणार दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामपंचायत कुंभोज कोरोना कमिटी व सर्वपक्षीय झालेल्या बैठकीमध्ये कुंभोज गावात सोमवार पासून पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला होता व त्याच्या अंमलबजावणीला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज नागरिकांनी सदर जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद देत मेडिकल, दवाखाने, दूध डेरी वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांनी बाहेर पडावे. गावात महिला बचत गटाच्या वसुलीसाठी येणारे अधिकाऱ्यांना गावाबाहेर रोखून ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्यात आले. परिणामी ग्रामपंचायत कुंभोज यांनी आज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या दंडात्मक कारवाई करून शंभर रुपये दंडाची कारवाई केली परिणामी यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर चालू केला असून त्याचा चांगला फायदा होत आहे. परिणामी सध्या कुंभोज मध्ये वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता जवळजवळ ऐंशी जणांना कोरोनाची लागण झालेली असून त्यातील साठ पेशंटने बरे होऊन घरी परतले.
जवळजवळ आठ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित नागरीक काही खाजगी व सरकारी ठिकाणी उपचार घेत आहेत परिणामी सरकारी आकडेवारी वगळता अनेक नागरिक खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची आकडेवारी अद्याप उपलब्ध झाले नाही. परिणामी कुंभोज ग्रामस्थांनी आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे असे आव्हान ग्रामपंचायत कुंभोज कोरूना कमिटी आरोग्य विभाग च्यावतीने करण्यात आले आहे.