कार्यकारी अभियंता अभय हेर्लेकर यांची माहिती
प्रतिनिधी / गगनबावडा
काल दिवसभर कुंभी धरण परिसरात जोरदार पाउस पडला. गेल्या २४ तासांत १४२ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी बुधवारी सकाळी साडेनऊ पासून जनरेशन युनिट मधून ३५० क्यूसेक विसर्ग तसेच धरणाचे दरवाजे उघडून ४०० क्यूसेक असे एकूण ७५० क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अभय हेर्लेकर यांनी दिली.
कुंभी धरण परिसरात काल १४२ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस झाला. आजही वाढता जोर कायम आहे. त्यामूळे नदीची पाणी पातळी वाढणार आहे. पावसाचे प्रमाण पाहून आणखी विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला आहे.