प्रतिनिधी / घुणकी
किणी ( ता हातकणंगले ) येथील ग्रामविकास अधिकारी यांना मारहाण केले प्रकरणी संशयित आरोपीवर पोलिसाकडून अद्याप कारवाई नाही. संशयित गावातून रूबाबात फिरत असूनही त्याचे वर लेखी तक्रार देवून कारवाई केली नाही . या वेळकाढू धोरणाविरोधात जिल्हयातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी ऊद्या दि .२ एप्रिल पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेने जिल्हा पोलिस प्रमुख. जिल्हाधिकारी. गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले .
याबाबत अधिक माहिती अशी दि .२६ मार्च रोजी किणी ग्रामपंचायतमध्ये ग्रा पंसदस्य प्रविण कुरणे व ग्राम विस्तार अधिकारी पंडित यांचेत दलितवस्ती मधील विकास कामाच्या बिलाबाबत वाद झाला होता. यावेळी वादाचे पर्यावसन हाणामारीत व धक्काबुक्कीत झाले .
हा सर्व प्रकार सीसी टीव्हीत चित्रीकरण झाला असून ग्रामविस्तार अधिकारी पंडित यांनी याबाबत वडगांव पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे . मात्र आयापही ग्रा पं . सदस्य प्रविण कुरणे याचे वर पोलिसांनी कारवाई केली नाही या मुळे शासकीय कर्मचारी भीतीमध्ये काम करत असून शासकिय कर्मचाऱ्यावर हल्ला व शासकिय कामात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तीना आळा बसावा यासाठी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा संघटनेकडून करने त आली आहे . अन्यथा ऊद या २ एप्रिल पासून जिल्हयातील सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन करणार असलेचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.









