कासेगाव / वार्ताहर
कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुधीर शिवाजी कदम (वय २५, रा. कुंडलवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथील पुण्याकडे जाणाऱ्या आशियायी महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल आशीर्वाद जवळ महामार्गावर हा अपघात झाला. या अपघाताची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. काल, गुरुवारी (दि.16) रात्री उशिरा हा अपघात झाला.
याप्रकरणी कार चालक सीताराम प्रकाश नारकर (वय २७, रा. फणसगाव, नारकवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (सद्या रा.ठाणे) याच्यावर भरधाव वेगाने कार चालवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आशियाई महामार्गावर असणाऱ्या कासेगाव येथील आशीर्वाद हॉटेल जवळील महामार्गावरून सुधीर कदम दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारकारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सुधीर कदम हे दुचाकीवरून खाली पडले. अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कदम हे पुणे येथे नोकरी करतात. घटनास्थळी कासेगाव पोलिसांनी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
Previous Articleराधानगरी वनपर्यटनातून विकलांग विद्यार्थी झाले प्रफुल्लित
Next Article सांगली : टाकळी येथे विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू








