धनगरासह महिलांवर हल्ला : वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज
वार्ताहर/कुदनूर
कळपातून भरकटलेल्या गव्याने कालकुंद्री – कुदनूर शिवारात वास्तव्य केले असून, लघू पाटबंधारे तलाव क्र. १ परिसरात संचार करत आहे. या गव्याकडून पिकांची नासधुस सुरू आहे. याशिवाय मानवावर हल्ला करण्याचे प्रकारही गव्याकडून घडत आहेत. सदर गव्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गासह ग्रामस्थांकडून होत आहे.
हा गवा शनिवार दि. १७ रोजी दुपारनंतर कालकुंद्री शिवारात निदर्शनास पडला. येथील वझर शेतात आपल्या मेंढ्यांच्या कळपासह तीन – चार धनगर होते. अचानक गवा मेंढ्यांच्या कळपाकडे आला. गव्यापासून मेंढ्यांना वाचविण्यासाठी धनगर आरडाओरड करू लागले. त्यातील बसप्पा हारुगुरे हा गव्याला जवळून हुस्कवायला गेला. मात्र, गव्याने त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तत्काळ हत्तरर्गी येथे हलवण्यात आले.
याचदरम्यान, गव्याने आपला मोर्चा कुदनूर परिसरातील शिवाराकडे वळवला. तेथे शेतात काम करत असलेल्या महिलांवर गव्याने हल्ला केला. गव्यापासून बचाव करत असताना त्यातील माधुरी खामकर व यल्लुबाई बंबर्गेकर या गंभीर जखमी झाल्या. किटवाड लघु पाटबंधारे तलावाच्या मुबलक पाणी साठ्यामुळे या परिसरात सदर गवा संचार करत असताना अनेकांच्या निदर्शनास येत आहे. कळपातून बाजूला गेलेल्या या गव्यामुळे कालकुंद्री-कुदनूर शिवारात काम करणाऱ्या शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने सदर गव्याचा बंदोबस्त करावा, ही मागणी जोर धरू लागली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









