उचगाव / वार्ताहर
इनोवा कार खरीदी देतो असे सांगून केदार दिलीप ढोणे ( वय३३. रा. लोणार वसाहत कोल्हापूर ) यांच्याकडून 3 लाख ८८००० रुपये घेतले मात्र चारचाकी गाडी दिली नाही म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सद्दाम खुदबुद्दीन जमादार व मयुर पाटील (दोघेही रा. मणेरमळा ) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. केदार ढोणे यांचा उचगाव हद्दीत सिमेंट पाईप विक्रीचा कारखाना आहे. सद्दाम जमादार व मयूर पाटील यांनी ढोणे यांना इनोवा कार खरेदी देतो असे सांगत फेब्रुवारी 2020 ते तीन ऑगस्ट 2020 या काळात रोख व चेक ३,८८००० ची रक्कम घेतली. यावेळी सद्दाम मुजावर व मयूर पाटील यांनी
एम एच 09 डी एक्स – 8699, एम एच 10 सी बी – 6006 या नंबरच्या दोन इनोवा कार दाखवल्या. मात्र पैसे मिळाल्यानंतर त्यांनी ढोणे यांना इनोवा कार खरेदी दिल्या नाहीत. काही कालावधी गेल्यानंतर ढोणे यांनी गाडी द्या अन्यथा पैसे परत करा असे सांगितले असता दोघांनीही पैसे परत देणार नाही व धमकी दिल्याची तक्रार ढोणे यांनी गांधीनगर पोलिसात दिली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास गांधीनगर पोलिस करीत आहेत.