कागल नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/सेनापती कापशी
कागल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कागल, मुरगूड शहरापाठोपाठ आजूबाजूच्या गावातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार नव्याने ४२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
कागल नगर परिषेदेचे आरोग्य निरीक्षक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कागल शहरामध्ये 14 रुग्ण आढळले. यामध्ये वृध्द पती-पत्नीसह ५ महिला, २ पुरुष, ३ तरुणी, ९ व ११ वर्षाची २ मुले, निढोरी गावामध्ये पाच रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ९ वर्षाच्या मुलगीसह १८ वर्षाचा मुलगा, २८ व ३४ वर्षाचा तरुण, ५० वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. केनवडेत ६ वर्षाच्या मुलासह २५ वर्षाची तरुणी व ५८ वर्षाची महिला, वंदूर- ६८ व ५८ वर्षाच्या दोन महिला, हसूर खुर्द ५३ वर्षाचा पुरुष, शिंदेवाडी (मुरगूड) मधील ५२ वर्षाचे पुरुष व ३२ वर्षाचा तरुण, चिमगाव ३१ वर्षाचा तरुण, कसबा सांगाव ५३ वर्षाचा पुरुष, आणूर ४० वर्षाची महिला, सुळकूड ६० वर्षाचा पुरुष, नानीबाई चिखली २ वर्षाच्या बालिकेसह एक वृध्द, ५० वर्षीय पुरुष, ४८वर्षीय महिला, २९वर्षीय तरुणी असे पाच रुग्ण. मुरगूडमध्ये एक, बोरवडे एक तर मौजे सांगावमध्ये १० व १२ वर्षाची दोन मुलं, एक तरुण व एक तरुणी असे चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Previous Articleबोगस ई-पास प्रकरण गुहागर तालुक्यातून मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
Next Article नीट, जेईई परीक्षांविरोधात सहा राज्यांकडून याचिका









