माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे व्यापारी, शेतकऱ्यांना आव्हान
प्रतिनिधी / कोल्हापूर
सुधारित कृषी विधेयक बहुमताने संसदेत मंजूर झालेले आहेत. या विधेयकामुळे साठेबाजीवरील नियंत्रण उठवण्यात आले आहे. तरी काही ठिकाणी धाडी टाकल्या जातात शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने घरात चोर घुसल्या नंतर हातात दांडके घेऊन त्याची पाठ सोलून काढतो त्याच पद्धतीने धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना सोलून काढा असे आव्हान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्या गोदामावर सरकारकडून धाडी टाकल्या जात आहे कांद्याचे भाव वाढले म्हणून धाडी टाकून शेतकऱ्यांना नुकसान करण्याचे पाप सरकारकडून सुरू आहे. जरी कांद्याची गोदाम व्यापाऱ्यांची असली तरी धाडीच्या भीतीने पुढील हंगामात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाणार नाही आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसेल आणि मातीमोल दराने कांदा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आत्ताच सावध झाले पाहिजे. भविष्यातील धोका दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.