कसबा सांगाव : वार्ताहर
कागल तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या कसबा सांगाव ग्रामपंचायतमधील विद्यमान उपसरपंचासह सात ग्रामपंचायत सदस्यांनी मनमानी कारभाराला कंटाळून आपले राजीनामे दिले. लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे यांचेकडे या सदस्यांनी आपले राजीनामे सुपुर्द केले.
मंडलिक गटाचे उपसरपंच विक्रमसिंह जाधव, रंजना माळी, वीरश्री जाधव, शेतकरी संघटनेचे राहुल हेरवाडे, दिपक हेगडे, सारिका मगदूम, राजे गटाचे पदमावती जाधव अशी या राजीनामे दिलेल्या सदस्यांची नावे आहेत.
मासिक सभेचे इतिवृत्त वेळेवर न लिहणे, इतिवृत्तमध्ये परस्पर फेरफार करणे, सभेत नोंदवलेले आक्षेप इतिवृत्तात न नोंदवणे, १४ व्या वित्त आयोगाच्या खर्चाचे वाचन न करणे, तसेच सदस्यानी मागणी केलेली माहिती नाकारणे अशा मनमानी कारभाराला कंटाळून उपसरपंचासह सात सदस्यांनी आपेल राजीनामे दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.पी. कांबळे उपस्थित होते. चावडी चौकात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून कागल पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
सन २०१४ साली ग्रामपंचाचत निवडणुकीत मुश्रीफ गटाचे लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे सह ७, मंडलिक गट ४, शेतकरी संघटना ४, राजे गट १, मुश्रीफ माने गट १, शिवसेना १ असे संख्या बळ निवडून आले आहेत. सध्या मुश्रीफ मंडलिक गटाची सत्ता ग्रामपंचायतमध्ये आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









