कळे / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील कळे ता. पन्हाळा येथील प्रसिद्ध व्यावसायिक कुटूंबातील दि. १९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आई आणि दोन मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर कळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली होती. आता याच कुटूंबातील वडिलांचा आज सहाव्या दिवशी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पन्हाळा तालुक्यात या कुंटूबाविषयी व्यक्त होणारी हळहळ कायम राहिली आहे.
कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यासह जिल्हाही हादरला होता याच कुटूंबातील कोरोनाने आज चौथा बळी घेतला आहे. कुटूंबातील पाच जन बाधीत होते त्यापैकी उपचारा दरम्यान चौघांचे निधन झाले असून पाचवा पोलीस दलात असणारा मुलगा याचेवर अद्याप उपचार सुरु असून तो या अजारातून सावरला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
पन्हाळा तालुक्याचा पश्चिम भाग, गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील काही गांवात व्यवसायामुळे आदरयुक्त दबदबा असलेल्या या कुटूंबातील चार व्यक्ती कोरोना संसर्गामुळे गेल्याने कळेसह परिसर हादरून गेला असून तो अजून यातून सावरलेला नाही या सर्व परिचीत कुटूंबात सद्या पोलीस दलात कार्यरत एकजन तसेच तीन भावांच्या पत्नी व यांची सहा मुले एवढेच पश्चात राहिले आहे.
Previous Articleतुंगतच्या सर्व्हेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
Next Article रेल्वेत चहा विकण्याच्या बहान्याने करतात चोरी









