प्रतिनिधी / कोल्हापूर
कळे, गगनबावडा रोड कळंबे येथे एसटी आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. करण दिपक माळवे. (वय-२७), संजय दिनकर माळवे (४४), आक्काताई दिनकर माळवे (६५) पुजा संजय माळवे अशी मृत व्यंक्तीची नावे आहेत तर एक बालक गंभीर असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती अशी की, कार मधून एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. या कारची एसटीला धडक झाली असुन. सदर कुटुंब विक्रमनगर कोल्हापूर येथील आहे.
माळवे कुटुंबीय हे कळे येथील आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी निघाले होते. त्या दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता कणकवली डेपो एसटी गाडी व इनोव्हा कार एम एच 09 बी डब्ल्यु 41 41 यांची समोरासमोर धडक झाली. यामधील जखमींना व्यक्ती सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









