प्रतिनिधी / पाचगाव
कळंबा (ता. करवीर) येथील श्री राम गल्लीमध्ये राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. योगेश सुभाष परब (वय ३२) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, योगेश परब हा युवक एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये असणाऱ्या स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन सीपीआर रूग्णालयामध्ये करण्यात आले. पण त्यांने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.