प्रतिनिधी / शिरोळ
कल्लेश्वर तलावाच्या सुशोभिकरण कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, या कामासाठी राज्य शासनातर्फे लागेल ती आर्थिक मदत केली जाईल अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ येथील कल्लेश्वर तलावाच्या सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनाचा समारंभ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडीत गणपतराव पाटील हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार राजू शेट्टी होते. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांनी स्वागत करून ते म्हणाले शिरोळच्या वैभवात भर होणार असून या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या ठिकाणी सुविधा पुरविल्या जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेंद्र माने पंचायत समितीच्या सभापती दिपाली परीट पंचायत समितीचे सदस्य सचिन शिंदे नगरसेवक प्रकाश गावडे तात्यासो पाटील योगेश पुजारी विठ्ठल पाटील बाबा पाटील कमलाबाई शिंदे, सुनिताआरगे, सुरेखा पुजारी अनिता संकपाळ, गजानन संकपाळ, डॉ. अरविंद माने, पंडित काळे, श्रीवर्धन माने देशमुख अमर शिंदे, इम्रान आत्तार प्रा अण्णासाहेब गावडे यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.