प्रतिनिधी /कसबा बीड
करवीर पश्चिम परिसरात धुवाधार पाऊस सुरु असल्याने महे-कसबा बीड व कोगे पूल पाण्याखाली गेले आहे. गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होत आहे. आज सकाळी पाच वाजता करवीर तालुक्यातील कसबा बीड व कोगे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. महे कसबा बीड दरम्यान पुलावरून होणाऱ्या जवळपास 25 गावाचा संपर्क तुटला आहे. कोगे- कुडित्रे व कसबा बीड- महे यादरम्यान या दोन्ही पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.
पावसाची संततधार सुरुच असल्याने पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ज्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यात भागांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पालन करून पुरग्रस्त लोकांना अलगीकरण करणे गरजेचे आहे.
Previous Articleसरस्वती वाचनालय, स्वरमल्हारतर्फे 24 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव
Next Article विशेष रेल्वेसोबतच सामान्यांची पॅसेंजरही चालवा









