विक्रांत कोरे/वंदूर
सभोवताली प्रसन्न वातावरण, सुसज्ज इमारत, डिजीटल साहित्य, कुशल व उत्साही अध्यापक वर्ग आणि ‘दिल्ली पँटर्न’ यामुळे कागल तालुक्यातील करनूरची प्राथमिक शाळा जिल्ह्यासह राज्यात मॉडेल ठरणार आहे.
कार्यालय, दहा खोल्या, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रत्येक वर्गात एल्ईडी दूरदर्शन संच, दोन प्रोजेक्टर, संगणक, षटकोनी इमारत, वर्ग निहाय भिंतीवर रेखाटलेली आकर्षक संकल्पना चित्रे, वैद्नानिक माहिती, नकाशे, भाषेतिल तक्ते, गणिते, खेळ यांसह सभोवताली सुंदर बाग, आयुर्वेदिक झाडे, सर्व खेळाचे साहित्य, विविधरंगी बेंच, प्रशस्त मैदान, सोलर वीज, आठ अद्यापक, १७० पटसंख्या अशा सर्व बाबींचा विचार करता ‘दिल्ली पॅटर्न’ राबविण्याची संकल्पना कोल्हापूरचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक मदनलाल मुथा यांच्या नजरेत आली. त्यांच्या प्रेरणेतून या उपक्रमास चालना मिळते आहे.
इस्त्रोचे तरुण वैद्नानिक धनेश बोरा यांचे या शाळेतील विद्यार्थी व पालकाना सततचे मार्गदर्शन लाभणार आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारती बरोबर, वातानुकूलीत वैशिट्य पुर्ण प्रयोग शाळा, कौशल्य कार्यशाळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्याना विविध उद्योजकता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण व संस्कार इथं दिले जाणार आहेत.
शाळेमध्ये ग्रामपंचायतीकडून एक लाख ऐशी हजारचा सोलर बसवण्यात आले आहे. या सोलर मधून निर्माण होणारी वीज एम एस सीबी घेणार असून त्यातून एम एस सीबी शाळेसाठी व अंगणवाडीसाठी मोफत वीज देणार असून वीज बिलाची चिंता शाळेची कायमस्वरूपी मिटणार आहे .
या पँटर्न अंतर्गत उर्वरीत भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ रुपये १० लाखाचा निधी मंजुर करून दिला आहे.
या वैशिष्टपुर्ण उपक्रमास कोल्हापूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आशा उबाळे,कागलचे गटशिक्षणाधीकारी डाँ जी . बी. कमळकर,शिक्षण विस्तार अधिकारी साै.सारीका कासोटे, विस्तार अधिकारी गावडे, केंद्रप्रमुख किणेकर, शाळेचे मुख्याध्यापक के. डी.पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका विजया देशमुख, सर्व शिक्षक स्टाफ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजमहंमद शेख, सरपंच लक्ष्मण भंडारे , सचिन घोरपडे, विजय चव्हाण, बाळासो पाटील, महावीर डूग्गे, वैभव आडके आदींसह बी. आर सी चे सर्व सदस्य, ,त्यांचे सहकारी ,शालेय व्यवस्थापन समीती यांचे अनमाेल सहकार्य लाभले आहे.
महापूरातील हिच ती शाळा…….!
गतवर्षी महापूराच्या पाण्यात तब्बल पंधरा दिवस पाण्यात असलेली हीच ती शाळा आहे. पण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या कष्टाने पुन्हा नव्या जोमाने शाळा नव्या संकल्पनेत उभारून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
Previous Articleबेळगाव जिह्यातील 23 जणांना कोरोनाची लागण
Next Article सांगली जिल्हय़ात चौघांचा मृत्यू, नवे 34 रूग्ण








