कबनूर / वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कबनूर ग्रामपंचायत वतीने विशेष मोहीम सुरू केली आहे. उद्या, मंगळवार (दि. 20) पासून दुपारी एक नंतर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कबनूर ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायत सभागृहांमध्ये सरपंच शोभा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. ब्रेक द चेंन या अंतर्गत शासनाने सुरू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण व विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्यावर शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे. दुकाने आस्थापना यांनी नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. एक नंतर मेडिकल सेवा वगळता संपूर्ण गाव लॉकडाऊन केले जाईल. मंगळवारी 20 पासून गावात दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार असून अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते एक पर्यंतच सुरू राहील. तसेच मेडिकल सुविधा 24 तास सुरू राहणार आहे. तर, आठवडा बाजार बंद राहणार असून भाजी विक्री सकाळी सात ते एक या वेळेत भागा भागात फिरून भाजीपाला विक्री करावयाचे असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तसेच गावामध्ये होत असलेल्या लसीकरणाचे नियोजन, उपाय योजना, मनुष्यबळ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना उपाय योजनेच्या अनुशंगाने तत्परतेने सुविधा पुरवण्यात येतील अशी माहिती ग्राम विकास अधिकारी बी.टी कुंभार यांनी दिली. किराणा दुकान व बेकरी दुकाना बाबत वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले. अखेरीस एक पर्यंत किराणा दुकान बेकरी दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला. याकाळात विनाकारण गर्दी करणारे व इतरत्र फिरणारे यांच्यावर कारवाईचा केली जाणार आहे. नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करून प्रशासनाला ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
बैठकीस उपसरपंच सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रमोद पाटील, मंडलाधिकारी जे.आर. गोनसाल्विस, तलाठी एस.डी .पाटील याच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Previous Articleलॉकडाऊनबाबत मुख्यमंत्रीच घेणार अंतिम निर्णय
Next Article हिंगणगाव येथील मंजूर रस्ता गेला चोरीला









