वार्ताहर / कबनूर
समूह संसर्गामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित संख्या वाढत आहे .रविवारी सायंकाळपर्यंत आणखीन पाच रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या 54 वर गेली आहे, त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. आज कबनूर येथील तिरंगा कॉलनी परिसरात दोन पुरुष व दोन महिला ना तसेच दत्तनगर परिसरा मध्ये एका पुरुष अशा 5 जणांना कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आजच्या दिवस अखेरीस गावांमध्ये पाच रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे आतापर्यंत बाधितांची संख्या 54 वर गेली आहे यामध्ये चार मयत आहेत. बाधी ताना पुढील उपचारासाठी संजय घोडावत विलगीकरण केंद्रा मध्ये दाखल करण्यात आले. या परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली आहे.
कोरोची तालुका हातकणंगले येथील तीन विहीर कोरोची हायस्कूल परिसरात एका पंचवीस वर्षे गरोदर महिलेस व साई कॉलनी मधील एका पुरुषाला असे दोन जणांना लागन झाल्याचे अहवाल मिळाले. गरोदर महिलेवर आय जी एम रूग्णालयात तर हातकणंगले ग्रामीण रुग्णालय संस्थापक विलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








