वार्ताहर / कबनूर
आज येथील माळ भागातील आवळे चौक परिसरात एक नव्याने 29 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर जय हिंद नगरमधील 46 वर्षाच्या व्यक्तीला अचानक त्रास होऊ लागल्याने आज सकाळी आय.जी.एम.मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच तिरंगा कॉलनी गल्ली नंबर1 मधील एक व्यक्ती उपचारासाठी मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती त्या व्यक्तीचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज अखेर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच माळ भागातील आवळे चौक परिसरात एका 29 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. माळ भाग व जयहिंद नगर परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्यावतीने सील करण्यात आला आहे. गावात कोरोनामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे.
कोरकी ता. हातकणंगले येथे आज पाटील वसाहत या परिसरात दोन रुग्ण व आवळे हायस्कूल परिसरात एक रुग्ण आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गावातील कोरोनाबाधितांची संख्या 13 वर पोहोचली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन्ही भागात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करून परिसर सील केला आहे.








