वार्ताहर/कबनूर
कबनूर, कोरोची परिसरात समूह संसर्गामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. त्यामुळे या दोन्ही गावात खळबळ माजली आहे. आज दिवसा अखेरीस कबनूर गावात एकूण 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गावातील एकूण पॉझिटिव्ह संख्या 80 वर जाऊन पोहोचली आहे.
दत्तनगर परिसर 2, सिद्धार्थ नगर परिषद 3 , माळ भाग परिसर एक, कागले गल्ली परिसर तीन, आझाद नगर परिसर 2, गांधी विकास नगर परिसर एक असे बारा रुग्ण आढळून आले आहेत. यात कागले गल्लीतील 47 वर्षे पुरुषाचा तर शंभूराजे कॉर्नर परिसरातील 55 वर्ष पुरुषांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर मृतांची संख्या एकूण सात झाली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून हा आलेख वाढतच चाललेला आहे. कोरोची तालुका हातकणंगले येथे आज नव्याने बस स्टँड परिसरात 1, लोकमान्य नगर परिसरात एक, व विवेकानंद नगर परिसरात एक असे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील रुग्ण संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे .यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. भागात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे.