वार्ताहर/पुलाची शिरोली
कठीण प्रसंगात जो कार्यरत राहतो तो निश्चितच कौतुकास्पद बनतो, रोटरीचे समाजातील कार्य असेच असल्याचे मत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पदग्रहण सोहळा झाला. रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बाबा जांभळे यांनी व सचिवपदी अनुप पाटील यांनी पदभार स्विकारला. अमर पंजवानी हे खजानिस बनले.
यावेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, रोटरीचे ट्रॅफिक व्यवस्थापन, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर अशा माध्यमातून पोलिस प्रशासनास सहकार्य केले आहे. स्मार्ट सिटी साठी स्मार्ट पोलिसिंग आवश्यक आहे. इमर्जन्सीमध्ये डायल ११२ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पोलिस प्रशासन राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोटरीचे नाव सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे आणि येणाऱ्या परिस्थितीकडे संधी म्हणून पहायचे असे मार्गदर्शन प्रांतपाल संग्राम पाटील यांनी केले. रोटरीची मुल्ये समजावून घेऊन रोटरी कायमस्वरुपी कार्यरत ठेवणे हे रोटरीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक प्रांतपाल बाळासाहेब ऊर्फ बी. वाय. कडोलकर, वारणा वडगावकर, अनुप पाटील, राजेंद्र जोशी, मानसिंग पानसकर, संजय देशिंगे, सुरेश पाटील, सहायक प्रांतपाल एस. एस. पाटील, पुरुषोत्तम खटवाणी, अजित शिवतारे, आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









