प्रतिनिधी / शिरोळ
एखाद्याचा बळी गेल्यानंतरच बांधकाम खाते व संबंधित अधिकारी डोळे उघडणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार ते जनता हायस्कूल अशा नऊ ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी वारंवार करुनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पद्माराजे विद्यालय तहसीलदार कार्यालय पंचायत समितीमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तींना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओंलाडावा लागतो.
येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पद्माराजे विद्यालय, जय भवानी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक, मटन मार्केट घालवाड फाटा या ठिकाणी प्रचंड वाहनांची कोंडी होत आहे. एकेरी वाहतुकीचा तर बट्ट्या बोळ उडाला आहे. यामुळे बहुतांशी ठिकाणी किरकोळ अपघात व वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. सध्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात सुरू असून ऊस वाहतूक तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी येथे जाण्यासाठी लांबून भाविक येत असतात शहरातील नऊ ठिकाणी गतिरोधक बसवा म्हणून वारंवार मागणी करण्यात आली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अद्यापि लक्ष घातल्याने एखाद्याचा बळी गेल्यानंतर लक्ष घालणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधितांनी तातडीने यांची दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









