स्टीव्हन अल्वारिस यांच्याकडून पदाची अतिरिक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी दीपक पाटील रूजू झाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणूनही त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. पाटील यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे मावळते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांच्याकडून स्वीकारली. अल्वारिस यांची धुळे येथे बदली झाली आहे. गेली तीन वर्षे अल्वारिस यांनी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली. आता या दोन्ही पदांची जबाबदारी पाटील यांना पार पाडावी लागणार आहे.
प्रादेशिक परिवहन खात्यामध्ये पाटील यांनी 1998 साली सहाय्यक परिवहन आयुक्त म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड पुणे त्याचबरोबर ठाणे येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम केले. त्याचबरोबर बारामती, अकलूज ,सोलापूर, नंदुरबार, अहमदननगर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. संगणक शिकाऊ लायसन्स प्रणाली त्यांनी स्वतः विकसित केली असून स्वयंचलित ड्रायव्हिंग टेस्ट प्रणाली राज्यात त्यांनी प्रथम बारामती येथे सुरू केली होती. दीपक पाटील यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.
कोल्हापूर परिवहन विभागाच्या माध्यमातून सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर आपला भर असेल. त्यादृष्टीने अभ्यास करून नियोजन केले जाईल. -दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर









