प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील वाघापूर गावच्या शेवंता पांडुरंग आरडे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला,रूग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पीटल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पार्थ प्रविणसिंह सावंत यांनी भुदरगड तहसीलदार यांच्याकडे केली.
निवेदनातील आशय असा की, आरडे यांना बुधवारी रोजी रात्री दहा वाजता हृदय विकाराचा झटका आला. त्यांच्या नातेवाईकांनी परिसरातील व कोल्हापुरातील अशा एकूण बारा हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी बरेच प्रयत्न केले परंतु सर्व हॉस्पीटलनी उपचारास नकार दिला आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यु झाला हा प्रकार दुर्दैवी असून अशा अनेक रुग्णांचा उपचाराअभावी खेडोपाडी मृत्यु तालुक्यात होत आहे.
शासनाने याची दखल घेऊन सामान्य जनतेची हालअपेष्ठा थांबवावी तसेच शेवंता पांडुरंग आरडे यांना उपचारास दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या हॉस्पीटलवर कडक कार्यवाही करावी.अन्यथा भाजप तालुका अध्यक्ष डॉ. विनायक परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुका भाजप युवा मोर्चा तिव्र आंदोलन उभा करेल याची आपण नोंद द्यावी असा इशारा ही सावंत यांनी दिला आहे.
Previous Articleकर्नाटकच्या कामगार मंत्र्यांना कोरोनाची लागण
Next Article सांगली : शिवसेना नेते, पदाधिकारी पॉझिटिव्ह









