पाणीपुरवठ्याचे 40 लाख थकीत वीज बिलाच्या व्याज माफासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेवून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
वार्ताहर / उदगांव
उदगाव ता. शिरोळ येथे होणाऱ्या तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचा कामाचा टेंडर पुढील महिन्यात निघणार असून तालुकयातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिने हे रुग्णांलय 100 बेडचे करणार असल्याचे त्याचबरोबरच उदगाव ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठ्याचे 40 लाख थकीत वीज बिलाचे व्याज माफ करण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेवून राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीचा हा प्रश्न सोडवू असे अश्वासन आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
उदगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्यमंत्री नामदार यड्रावकर यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उदगाव येथील नूतन पेयजल योजनेची मुख्य जलवाहिनी टाकून त्याचबरोबर ग्रामस्थांना पाणी कनेक्शन जोडावे असेही ते म्हणाले. कुबेर मगदुम यांनी महावीर कॉलनीसह अन्य भागात तात्काळ नळ कनेक्शन देण्याची मागणी केली. तर रामचंद्र बंडगर यांनी पेजयल योजना व ठेकेदार यांच्याकडून होत असलेल्या गैरसोयी बाबत राज्यमंत्र्यांना माहिती दिली. राजेंद्र मगदुम यांनी गावातील मुख्य सांडपाणी गटर्सचा प्रश्न सोडविण्या साठी योग्य उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी केली.यावर आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी प्रशासक संदेश बदडे ग्रामविकास अधिकारी रयसिंग वळवी यांना याबाबत त्वरित प्रस्ताव तयार करुन हा प्रश्न निकालात काढण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, संजय चौगुले, बाळासाहेब कोळी, फारुख मोळे, सुरगोंडा पाटील, शंकर पुजारी, प्रविण मगदुम, अभिजित पाटील, अशोक वरेकर, खुद्बुद्दिन पेंढारी, दिलिप आंबी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









