वार्ताहर / उत्तूर :
गुरुवारी पहाटे उत्तूर -निपाणी मार्गावर झालेल्या अपघातात कुडाळ येथील एकाचा मृत्यू झाला. उत्तूरजवळ कार पलटी होऊन झालेल्या अपघातात रोहीत रमाकांत कुडाळकर (वय २५, रा. कुंभारवाडी, ता. कुडाळ) या युवकाचा मृत्यू झाला असून या अपघातात ओमकार वातावलकर (वय २४, रा. लक्ष्मीवाडी), जगन्नाथ पेडणेकर ( वय ३० रा.कुडाळेश्वरवाडी ), रघुनाथ कुंभार (वय ३०, रा. कुंभारवाडी, ता. कुडाळ हे जखमी झाले आहेत. जखमींवर गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










